Ad will apear here
Next
कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना तिसरीतील कार्तिकीची मदत


ठाणे :
राबोडी येथील सरस्वती स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेत तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कार्तिकी चव्हाण हिने आपल्याला खाऊसाठी, तसेच बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशांतून कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना दोन हजार रुपये मदत केली. 

कार्तिकीचे वडील प्रा. किरणकुमार चव्हाण हे कल्याणमधील मराठी नाट्य मंडळात पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या साहित्याचे पॅकिंग करण्यासाठी गेले होते. ते पाहून आपणही मदत करू शकतो असा विचार कार्तिकीच्या मनात आला. न्यूज चॅनलवरील मदतीच्या बातम्या पाहून त्यांना मदत करावी, असे आपल्याला वाटल्याचे तिने सांगितले. 

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा करण्यासाठी धनादेश सुपुर्द केला. ‘एवढ्या लहान वयात असे विचार मनात येणे हे कौतुकास्पद आहे,’ अशा शब्दांत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तिचे कौतुक केले. कार्तिकीचे वडील ठाण्यातील न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेत समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZWKCE
Similar Posts
तुम्हालाही पूरग्रस्तांना मदत करायचीय? असे आहेत पर्याय... पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणांसह राज्याच्या विविध भागांतील खासगी संस्था, संघटनांनीही युद्धपातळीवर कार्य सुरू केले आहे. त्यात राज्यातील नागरिकांनाही सहभागी होता येईल. त्यापैकी काही पर्यायांची माहिती येथे देत आहोत.
पूरग्रस्तांसाठी ‘माय लाइफस्टाइल मार्केटिंग’कडून २५ लाखांची मदत मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. डायरेक्ट सेलिंग व्यवसायातील अग्रगण्य असलेल्या ‘माय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून २५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला करण्यात आली. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना रत्नागिरीकरांकडून मोठी मदत! रत्नागिरी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची रत्नागिरीतील अनेकांची इच्छा होती. त्यामुळेच, रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने ‘एक हात मदतीचा.. माणसातील माणुसकीचा’ असे आवाहन केल्यावर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मदत गोळा करण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language